लोकांचे मनःस्वास्थ्य जपण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंदिरे खुली करा ! – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट
मंदिरांमध्ये होणारे देवाचे दर्शन, प्रार्थना, धार्मिक वातावरण हे सर्व भाविकांच्या श्रद्धा जपणारे असल्याने लोकांमध्ये असलेली कोरोनाच्या साथीविषयीची भीती दूर व्हायला साहाय्य होईल, तसेच काही आजारांनंतर मानसिक स्थिती असंतुलित होते.