
ठाणे, २३ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात मागील २४ घंट्यांत मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. बारवी धरणाचा पाणीसाठा ६३.५३ टक्के झाला आहे, तर तानसा आणि मोडक सागर ही दोन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या भातसा धरणातही ७३.३७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ठाणे येथील झाड कापतांना पडून एका कर्मचार्याचा मृत्यू झाला.
मुरबाडमध्ये मागील २४ घंट्यांत जिल्ह्यात २४ झाडे कोसळली, तर १६ ठिकाणी फांद्या पडल्या. ७ झाडे धोकादायक स्थितीत आढळली. ढोकाळी नाका येथे झाड कोसळून वाहनाची हानी झाली.
टिटवाळा-फळेगाव मार्गावरील काळू नदीवरील रूंदे पूल तसेच वाळकस-वेहळे पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. १० हून अधिक गावांचा टिटवाळा आणि मुरबाड परिसराशी संपर्क तुटला. पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त होता.
डहाणू, तलासरी, पालघरसह अनेक ठिकाणी पाणी साचले. बोर्डी, डहाणू परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक दुकाने आणि घरे यांत पाणी शिरले. घोलवड-उंबरगाव, तसेच वाणगाव-डहाणू यांमध्ये पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. झाडे उन्मळून पडण्यासह वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडल्या.
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसगाड्या मिळणार !
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !
छत्रपती संभाजीनगर येथे ‘उत्तम उपाहारगृहा’वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !