भाजपच्या खासदारांकडून अशी कृती हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या जागेश्वर धाम या तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेलेले उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी पुजार्यांना शिवीगाळ केली. या घटनेची तक्रार मंदिर प्रशासनाने पोलिसात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक अन्वेषण करीत आहेत. धर्मेंद्र कश्यप यांचा शिवीगाळ करतांनाचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
बीजेपी सांसद धर्मेंद्र कश्यप का वीडियो वायरल #Uttarakhand https://t.co/bFppKhoT5c
— AajTak (@aajtak) August 2, 2021
१. खासदार धर्मेंद्र कश्यप आणि ३ जण दुपारी ३.३० च्या सुमारास मंदिरात गेले होते. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ते मंदिरात बसून होते. सध्या कोरोना निर्बंधामुळे हे मंदिर संध्याकाळी ६ वाजता बंद होते. पुजार्यांनी खासदारांना मंदिरातून बाहेर जाण्याची विनंती केली; मात्र त्यांनी गैरवर्तन करत शिवीगाळ केली.
२. उत्तराखंडमधील काँग्रेसचे नेते गोविंदसिंह कुंजवाल यांनी भाजपचे खासदार कश्यप यांच्या गैरवर्तवणुकीनंतर ठिय्या आंदोलन केले. त्यांच्यासमवेत मंदिर समितीतील लोकांनीही आंदोलन केले.