राज्यातील ३४ आस्थापनांना नोटीस

पुणे – ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफ्.डी.ए.ने) पुणे विभागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, कँटीन आणि दुग्ध आस्थापने यांवर कारवाई करून १२ आस्थापनांचे व्यवसाय परवाने निलंबित केले. पुण्यातील ‘जोकर हॉस्पिटॅलिटी’ (बालेवाडी) आणि ‘रेड अँड ह्युज’ (कल्याणीनगर) यांचा समावेश आहे. पडताळणीच्या वेळी स्वयंपाकगृहातील अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि अन्न सुरक्षा अन् मानके नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
या पडताळणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत कारवाई करण्यात आली. त्यात पुण्यातील ८, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील २, सांगली आणि कोल्हापुरातील प्रत्येकी १ यांचा समावेश आहे. राज्यभराच्या मोहिमेत एकूण १०३ हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाबे यांची पडताळणी केली. त्यात ३४ आस्थापनांना सुधारणा नोटीस दिली, तसेच १६ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसगाड्या मिळणार !
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध