पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी

पत्नीकडे केली २ कोटी रुपयांची मागणी

प्रतिकात्मक चित्र

मडगाव, २३ जुलै (वार्ता.) – कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण करणे आणि शिव्या घालणे, तिचे दागिने बळकावणे, तसेच तिची आक्षेपार्ह छायाचित्रे सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणी संशयित शशांक नाईक याच्या विरोधात कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याविषयी अश्विनी एन्.व्ही. (वय २५ वर्षे) यांनी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, गांधी मार्केट, मडगाव येथे रहाणारे शशांक विनोद नाईक (वय ३१ वर्षे) यांनी नोव्हेंबर २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत वार्का आणि कोलवा येथे पत्नी अश्विनी हिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. तिला अश्लील भाषेत शिव्या देऊन मारहाण केली. त्याचप्रमाणे पत्नीने दिलेले दागिने परत न करता स्वतःकडे ठेवले. या प्रकरणी कोलवा पोलिसांचे अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • समाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते या घटनेतून दिसून येते. पैशांसाठी स्वतःच्या पत्नीचीच आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करणे, ही आसुरी वृत्तीच होय !
  • शैक्षणिक अभ्यासक्रमातून नैतिकतेचे शिक्षण न देता केवळ पोटभरू शिक्षण दिल्यामुळेच अशा प्रवृत्ती निर्माण होतात.