पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ गणपति ट्रस्ट आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांचा सरकारला प्रश्न
पुणे, ३ ऑगस्ट – ज्या शहरांत किंवा जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग दर अल्प आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळे काही नियम आणि अटींनुसार चालू करण्याला अनुमती देण्यात आली आहे. राज्यात दुकाने आणि हॉटेल्स चालू करण्यासाठी अनुमती मिळत असेल, तर मग मंदिरांविषयी दुजाभाव का ? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारने तातडीने मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, तसेच सकाळी ६ ते ११ पर्यंत मंदिरे चालू ठेवण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ गणपति ट्रस्टकडून करण्यात आली आहे.
सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा, तसेच लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.