पोलिसांनी हस्तक्षेप करून प्राण वाचवले
हळर्णकर यांचा पारंपरिक वडिलोपार्जित घर पाडले जात असल्याचा दावा

पणजी, २३ जुलै (वार्ता.) – तेमवाडा, मोरजी या ठिकाणी समुद्रकिनारी भागात किनारपट्टी नियमन क्षेत्र कायद्याचे उल्लंघन केलेली बांधकामे पाडण्याची कारवाई सलग चौथ्या दिवशी म्हणजे २३ जुलै या दिवशी चालू होती. या कारवाईच्या वेळी आपले पारंपरिक वडिलोपार्जित घर पाडले जात असल्याचा दावा करून एका रहिवाशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून त्याचे प्राण वाचवले.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तेमवाडा येथील रहिवासी राजन हळर्णकर यांनी त्यांचे घर पाडले जाणार असल्याच्या मानसिक तणावामुळे गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच हस्तक्षेप करून त्याचे प्राण वाचवले. या घटनेनंतर काही काळ त्यांच्या घराजवळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. राजन हळर्णकर यांच्या कुटुंबियांनी पूर्वजांची घरे वाचवण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. ‘भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे उत्तरदायित्व कोण घेणार ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तेमवाडा समुद्रकिनारी भागातील भूमीचे मालक अनिल नाईक यांनी त्यांच्या जागेत किनारपट्टी नियमन क्षेत्र नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक बांधकामे उभारल्याची तक्रार संबंधित विभागाकडे केली होती. या घटनेनंतर न्यायालयाच्या आदेशांची कार्यवाही करतांना पाडल्या जाणार्या घरांतील कुटुंबांचा विचार करून प्रशासनाने संवादातून तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !