
तीर्थहळ्ळी (कर्नाटक) – हणगेरे येथील हजरत सय्यद सादत दर्गा, मृगवधे येथील मल्लिकार्जुन मंदिर आणि तीर्थहळ्ळी येथील रामेश्वर मंदिर यांच्या हुंडीतील पैशांची काँग्रेस नेत्यांनी लूट चालवली आहे. राज्यातील मंदिरांची देखरेख करणार्या सरकारी मुजराई विभागाच्या खात्यातून १८ लाख रुपये मिळवण्यासाठी त्यांनी विविध नाटके केली, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार आरागा ज्ञानेंद्र यांनी केला. ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमदार ज्ञानेंद्र यांनी केलेले गंभीर आरोप !
१. हणगेरे आणि मृगवधे येथील दर्गा-मंदिर यांसाठी प्रत्येकी ७, तर रामेश्वर मंदिरासाठी ३ उंच दिवे बसवण्यात आले आहेत. ‘सरकारकडून यासाठी निधी संमत करून आणतो’, असे सांगून काँग्रेसी नेत्यांनी मंदिराच्या मुजराई विभागाच्या खात्यातून पैसे काढले. १ लाख २० सहस्र रुपये मूल्याच्या दिव्यांसाठी साडेचार लाख रुपयांचे देयक बनवून घेतले.
२. मुजराई खात्यातून आतापर्यंत कोणत्याही उपविभागीय अधिकार्याने, तहसीलदाराने किंवा मुजराई लिपिकाने पगार घेतलेला नव्हता. आता आलेल्या अधिकार्यांनी मात्र पगाराच्या नावाखाली पैसे घेतले आहेत.
या वेळी भाजप तालुका घटकाचे अध्यक्ष नवीन हेद्दूरु, नेते नागराज शेट्टी, संदेश जवळि, रक्षित मेगरवळ्ळी, चंदवळ्ळी सोमशेखर, कानुकोप्पा शिवकुमार, संतोष देवाडिग, अभी कोंड्लुरू, सुदर्शन बाळेकोप्प, कासरवळ्ळी श्रीनिवास, अभिलाष कैमर, चेतन इंगलादी आदी उपस्थित होते.
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !
छत्रपती संभाजीनगर येथे ‘उत्तम उपाहारगृहा’वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !