
नाशिक – ‘सिंहस्थ कुंभपर्व २०२७’च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी एक विशेष प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महायुतीचे नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘पी.एम्. – ईबस सेवा’ योजनेअंतर्गत नाशिक सिटी लिंक आणि जे.बी.एम्. इकोलाईफ मोबिलिटी प्रायवेट लिमिटेड यांच्यात १० वर्षांच्या कालावधीसाठी ५० अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस पुरवण्याविषयी करारनामा करण्यात आला. या करारामुळे नाशिककरांना सुरक्षित, आरामदायी, आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या काळात लाखो भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी वाहतूक व्यवस्थेला मोठा आधार मिळेल.
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !
छत्रपती संभाजीनगर येथे ‘उत्तम उपाहारगृहा’वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !