कोरोनाची चाचणी न करताच शाळेत उपस्थित झालेले शिक्षक कोरोनाबाधित आढळले

सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा चालू करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करून शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आदेश आहेत; परंतु चाचणी न करताच येथील एका नामांकित माध्यमिक शिक्षण संस्थेत एक शिक्षक २३ नोव्हेंबर या दिवशी शाळेत उपस्थित झाले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा ! – विशालसिंग राजपूत, शिवसेना

शहरप्रमुख श्री. विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शहर कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

फ्रान्समधील ‘त्या’ शाळेला ‘सर्वांना ठार करू’ अशी धर्मांधांकडून धमकी

धार्मिक भावना दुखावल्यावर असहिष्णु धर्मांध कायदा हातात घेतात, तर सहिष्णु हिंदू साधा निषेधही नोंदवत नाहीत !

७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ! – आयुक्त

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

शिक्षक आणि एस्.टी.चे कर्मचारी यांची कोरोनाशी संबंधित चाचणी करण्यास प्रारंभ

इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास, तसेच पूर्ण प्रवासी क्षमतेने एस्.टी.ची सेवा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे एस्.टी.चे कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षक यांच्या कोरोनाशी संबधित चाचण्या जिल्हा अन् तालुका या स्तरांवर चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

२६ नोव्हेंबरला सरकारी कर्मचारी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार

देश कठीण आर्थिक स्थितीतून जात असतांना, लक्षावधी लोक बेरोजगारीला तोंड देत असतांना कर्मचार्‍यांनी अशा प्रकारे संप करून जनतेला आणि सरकारला नाडणे कितपत योग्य ? हक्कांसमवेत चोख कर्तव्याचा विचार कर्मचारी संघटना करतात का ?

राज्यातील शाळा चालू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना

शाळांना सॅनिटायझर, थर्मलगन, ऑक्सिमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे

राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी वर्ष २०२०-२१ करता राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी खैरात वाटणारे शासन वेदपाठशाळांना अनुदान देणार का ?