पीडितेच्या आई-वडिलांना अश्लील संदेश पाठवले
लोअर परेल (मुंबई) – येथे रहाणार्या २४ वर्षांच्या शिक्षिकेची सामाजिक माध्यमावर अपकीर्ती केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने पीडित शिक्षिकेच्या आई-वडिलांसह मित्रांना काही अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवली होती. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार महिला एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. १७ जानेवारीला तिच्या भ्रमणभाषची चोरी झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या आई-वडिलांना अश्लील संदेश पाठवण्यात आले होते. यातून तिची अपकीर्ती करण्याचाच प्रयत्न होता.
संपादकीय भूमिका :अशांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |