केंद्र सरकारने अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल ९ रुपये ५० पैसे, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल यांवरील अबकारी करात कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपयांनी आणि डिझेलवर प्रति लिटर ६ रुपयांनी अल्प करत आहोत.