
सातारा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्या ‘मे. जय माता इंटरनॅशनल प्रा.लि.’ आस्थापनाने १९ कोटी ३९ लाख ५९ सहस्र २९३ रुपये कराची रक्कम शासनाकडे भरलेली नाही. त्यामुळे राज्य कर उपायुक्तांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पुणे येथील वानवडी येथे रहाणार्या जिंदाल कुटुंबातील तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्य कर उपायुक्त साई तुषार वाघचौरे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, संबंधित आस्थापनामध्ये ज्योती अशोक जिंदाल, रोहित अशोक जिंदाल आणि अशोक सवरलाल जिंदाल हे संचालक म्हणून कामकाज पहातात. त्यांनी वर्ष २०१३-१४ ते वर्ष २०१६-१७ या कालावधीतील १९ कोटी रुपयांहून अधिक विक्रीकर थकवला आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलाची हानी झाली आहे. तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर २००२ कलम ७४(२) अन्वये जिंदाल कुटुंबियांवर गुन्हा नोंद केला आहे; मात्र याविषयी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !