केंद्र सरकारने अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल ९ रुपये ५० पैसे, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त

नवी देहली – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल यांवरील अबकारी करात कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपयांनी आणि डिझेलवर प्रति लिटर ६ रुपयांनी अल्प करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैसे, तर  डिझेलचे दर ७ रुपयांनी अल्प होणार आहेत. तसेच ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर (१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.