
पिंपरी – मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात प्राथमिक चौकशीचे काम तातडीने पूर्ण करावे आणि संबंधित आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करावा, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकार्यांना केली. डॉ. सूर्यवंशी यांनी दुर्घटनेच्या संदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. या दुर्घटनेत अडकलेल्या सर्व कामगारांचे शोधकार्य पूर्ण झाल्याने बचाव मोहीम थांबवली आहे. या घटनेच्या संदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग, तसेच ‘अँटोनी लारा रिन्यूएबल’ या संबंधित ठेकेदार आस्थापनाला नोटीस देण्यासह या दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.