कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते दुसरीकडे हालवावेत ! – सर्वोच्च न्यायालय
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्या २ मासांत मृत्यू झाला आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत उर्वरित चित्यांना दुसर्या उद्यानात हलवण्याचा विचार करावा, असे वन्यजीव तज्ञ समितीला सांगितले आहे.