मुख्यमंत्र्यांचा बंगला थकबाकीदार सूचीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेने थकबाकीदार सूचीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेने थकबाकीदार सूचीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली.
आज विविध प्रकारच्या आक्रमणांनी देव, देश आणि धर्म संकटात आले आहेत. यांचे रक्षण करायचे असेल, तर आपण केवळ जन्महिंदु असून चालणार नाही, तर कर्महिंदु बनले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी केले.
शक्ती कायद्याचे विधेयकात आरोपीला २१ दिवसांत शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये फाशी आणि जन्मठेप या शिक्षांचाही समावेश आहे.
सभागृहात वाद घालणारे नकोत, तर वाद सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत !
या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘सत्ताधारी पक्षाने पत्रकार परिषदेत सर्व विधेयकांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले; मात्र एवढ्या अल्प वेळेत १० विधेयकांवर चर्चा कशी काय होणार ?
शुल्क न भरणार्या विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करणार्या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करावी यासाठी १० डिसेंबर या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत पालकांनी आंदोलन केले होते.
वन्य प्राणी मनुष्यवस्तीत येण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता यापुढे वनाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यातील नियमित संवाद वाढण्याची आवश्यकता आहे. या दोघांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास घटनेची तीव्रता अल्प करणे शक्य आहे, असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. त्याच हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.
महिलांविषयी महत्त्वाच्या असणार्या ‘शक्ती’ कायद्यावरील महत्त्वाचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडतांना विधेयकाचे प्रारूप किंवा त्यावर कोणतीही चर्चा सरकारने घडवून आणलेली नाही.