
छत्रपती संभाजीनगर – ‘महाराष्ट्रात सद्यःस्थितीत रेव्ह मेजवान्यांचे (अमली पदार्थांच्या मेजवान्या) प्रमाण अत्यंत चिंताजनक रितीने वाढत चालले आहे. काही समाजकंटक अशा देशविघातक कृत्यांना उघड पाठिंबा देत आहेत. या मेजवान्यांमुळे तरुण पिढी पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. पोलिसांनी अशा घटकांवर केवळ वरवरची कारवाई न करता ‘रेव्ह मेजवान्यांचे आयोजन करणारे आणि त्यात सहभागी असणारे यांवर थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कठोर कारवाई केली पाहिजे’, अशी आग्रही मागणी शिवसेना प्रवक्ते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नुकतीच पत्रकारांशी बोलतांना केली.
या वेळी त्यांनी नाशिक येथील बहुचर्चित ‘कॉर्पाेरेट जिहाद’ प्रकरण केवळ नाशिकपुरते मर्यादित नाही. यामागे मोठे षड्यंत्र असून माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक केल्याविना या प्रकरणाचे मूळ आणि पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार नाहीत. जलील यांनीच मतीन पटेल यांच्याकडे संशयित आरोपी निदा खान यांना पाठवले होते.
शासकीय कामांमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवत संजय शिरसाट म्हणाले की,
अनेक मोठे कंत्राटदार शासकीय कामे स्वतः पदरात पाडून घेतात आणि नंतर ते काम दुसर्या कंत्राटदाराला वर्ग करतात. या प्रक्रियेत दोन्ही कंत्राटदार आपला नफा काढून घेत असल्यामुळे मूळ कामासाठी अत्यंत अल्प निधी उरतो. परिणामी विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होतात. या गंभीर प्रकाराविषयी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर माहिती दिली असून ते लवकरच अशा कंत्राटदारांवर कडक कारवाई करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धांमुळे गॅस सिलिंडरचे शुल्क वाढत आहेत. जोपर्यंत पेट्रोल-डिझेलचा वापर पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत अशा किंमतींवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !