महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !

प्रवाशांसमवेत उद्धट वर्तन केल्याचे प्रकरण !

वाहतूक निरीक्षक खान

  महाबळेश्वर (सातारा) – प्रवाशांच्या वतीने महाबळेश्वर आगारामध्ये प्रवासी आणि वार्ताहर यांच्याशी उद्धटपणे बोलणार्‍या वाहतूक निरीक्षकांच्या विरुद्ध महाबळेश्वर आगारप्रमुख अन् सातारा विभागीय नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरूख खान यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन  सातारा विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी खान यांना तात्काळ निलंबित केले.

महाबळेश्वर आगारातून सुटणारी बस १ घंटा विलंब झाला तरी सोडली जात नव्हती; म्हणून प्रवासी वाहतूक निरीक्षक खान यांना विनंती करण्यासाठी गेले. प्रवासी आपल्या अडचणी मांडत असतांना त्यांच्याशी योग्य पद्धतीने संवाद न साधता वाहतूक निरीक्षक वाद घालायला लागले.

याच बसमधून प्रवास करणार्‍या एका वार्ताहराने प्रवाशांच्या तक्रारींची नोंद घेत त्यांना माहिती विचारली; मात्र त्यांनी वार्ताहराशीही असभ्य आणि उद्धट भाषेत संवाद साधत अपशब्दांचा उपयोग केला. याविषयी दोषी अधिकार्‍यांवर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी, वार्ताहर आणि नागरिक यांनी केली होती.

संपादकीय भूमिका

    प्रत्येक ठिकाणी उद्दामपणा करण्याची धर्मांधांना सवय लागली आहे. अशांवर त्वरित कारवाई झाल्यासच त्यांच्यावर वचक बसेल, हे निश्चित !