केंद्राकडून मिळणार १ कोटी रुपयांचे अनुदान

पणजी – चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी गावाची ‘आदर्श सौरऊर्जा गाव’ म्हणून निवड झालेली आहे. ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’च्या अंतर्गत समुदाय आधारित सौरऊर्जा प्रकल्पांसाठी गावाला १ कोटी रुपयांचे केंद्रीय अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील घोषणा दक्षिण गोवा समन्वय आणि देखरेख समितीच्या बैठकीत करण्यात आली. ‘गोवा ऊर्जा विकास एजन्सी’ यांनी नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात दक्षिण गोव्यातील ७ गावांमध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. सौरऊर्जेचा वापर आणि क्षमतेचे निकष यांवर दाबोळी आणि लोटली गावांमध्ये चुरस होती; मात्र दाबोळीने आघाडी घेत सौरग्रामचा मान पटकावला.
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल