
कोल्हापूर – ‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याच्या प्रारंभी पावनखिंडपूजन, विशाळगडावर मुंड द्वार येथे दुर्गापूजन, गडावरील देवतांचे पूजन करण्यात आले. पालखीतून भगवंतेश्वर मंदिरात उत्सवमूर्ती आणून त्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने बसवलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ५ फुटी सिंहासनारूढ मूर्तीसमवेत उत्सवमूर्तीचे पूजन मंत्रोच्चारात करण्यात आले. या प्रसंगी दुग्धाभिषेक आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आणलेल्या १४ दुर्गांवरील जलाने अभिषेक करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात सुवर्णनाणी अभिषेक आणि आतषबाजी करून प्रसाद वाटप करण्यात आले.
या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. रणजित घरपरणकर, कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, सोहळा समितीप्रमुख ऋषिकेश देसाई, खजिनदार श्री. विनायक मांजरेकर, सर्वश्री प्रवीण जाधव, सतीश सुतार यांसह शिवभक्त, ग्रामस्थ उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा