दीडशे किलोपेक्षा अधिक गांजा जप्त !
नागपूर – येथे ट्रकमधून दीडशे किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जोगेश देवूरी (वय ३० वर्षे) आणि महेंद्र देवूरी (वय ४० वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी १ कोटी ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (गांजाचे समूळ उच्चाटन का केले जात नाही ? – संपादक)
गटारात उतरून स्वच्छता !
टिटवाळा – येथे स्वच्छता कर्मचार्यांना गटारात उतरून मैला काढावा लागत आहे. या वेळी त्यांच्याकडे पुरेशी सुरक्षा साधने उपलब्ध नव्हती. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
माहिती अधिकारासाठी ६ महिने हेलपाटे !
पेण – माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेली माहिती मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांना पंचायत समितीच्या कार्यालयात ६ महिने हेलपाटे घालावे लागले. ग्रामसभा, मासिक सभा यांच्याविषयीची माहिती त्यांनी मागवली होती.
१० जून ते ५ सप्टेंबर पर्यंत भिडे पूल बंद !
पुणे – डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणार्या पादचारी पुलाच्या कामासाठी ९ जूनच्या मध्यरात्रीपासून ५ सप्टेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी चालू असेल. नागरिकांनी तोपर्यंत लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रीज या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शासकीय अध्यापक विद्यालयात चोरी !
अलीबाग (जिल्हा रागयड) – सासवणे येथील शासकीय अध्यापक विद्यालयात शाळेच्या खोल्यांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १४ सहस्र ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तसेच तक्रारही प्रविष्ट झाली आहे. (चोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्याकडून सव्याज दंडवसुली करावी ! – संपादक)
मनसेचे मुरबाडचे पदाधिकारी अपघातात घायाळ !
बदलापूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाडचे पदाधिकारी राजेश शेटे यांना एका भरधाव चारचाकीने येथे जोरदार धडक दिली. यात ते गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल
‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !