विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकर गायकर यांचा महाराष्ट्र शासनाला सल्ला

देवगड – सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याऐवजी त्या त्या देवस्थानांतील विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा. स्थानिक विश्वस्त आणि भक्तगण मंदिरांचे व्यवस्थापन अधिक दायित्वाने अन् पारदर्शकपणे करू शकतात, असा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे. मंदिरांची ज्या आत्मीयतेने, श्रद्धेने आणि तळमळीने सेवा व्हायला हवी, ती अनेक ठिकाणी होतांना दिसत नाही. सरकारी यंत्रणेकडून मंदिरांचे व्यवस्थापन केले जात असले, तरी अनेक ठिकाणी ते केवळ नोकरीच्या दृष्टीकोनातून चालवले जात असल्याचे दिसते; मात्र गावागावातील स्थानिक मंडळी ज्या भावनेने, हृदयापासून आणि भक्तीभावाने मंदिरांचे पावित्र्य जपतात, तशी भावना सरकारी व्यवस्थेत अनेकदा दिसून येत नाही, असे मत विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय मंत्री श्री. शंकर गायकर यांनी व्यक्त केले. (याच कारणास्तव मंदिरे सरकारच्या अधिपत्याखालून मुक्त करायला हवीत ! – संपादक)
श्री. गायकर यांनी ८ जून या दिवशी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिराला भेट दिली. या वेळी मंदिर परिसराची पहाणी करून त्यांनी कुणकेश्वर मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. मंदिर समितीचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते श्री. गायकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी विजय राऊत, महेश नाईक, हरिश्चंद्र राऊत, अनिल येवले, गणेश वाळके, हेमंत वातकर, उदय पेडणेकर, संजय वाळके, तसेच सरपंच महेश ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी गायकर यांनी उपस्थित केलेली सूत्रे
१. पंढरपूर, शनिशिंगणापूर यांसह अनेक मोठ्या देवस्थानांची आजची परिस्थिती चिंताजनक आहे. हिंदु भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निधीचा वापर अपेक्षित पद्धतीने होत नसल्याची भावना अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे.
२. कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये मंदिरांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात; मात्र त्या निधीचा उपयोग मंदिराचा विकास, धार्मिक कार्ये आणि भाविकांसाठी सुविधा यांसाठी पुरेशा प्रमाणात होतांना दिसत नाही.
३. हिंदूंच्या देवस्थानांमध्ये अनेक ठिकाणी धर्माशी संबंध नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते. अशा नियुक्त्या योग्य पद्धतीने झालेल्या नसून राजकारण आणि व्यापारीकरण वाढल्याचे चित्र दिसत आहे.
४. श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या देवस्थानांचे व्यापारीकरण होणे, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. पैशाच्या प्रलोभनासाठी देवाचाच बाजार मांडला जात असल्याची भावना भाविकांमध्ये निर्माण होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी मंदिरांना अधिक स्वायत्तता मिळणे आवश्यक आहे.
५. देशभरात विश्व हिंदु परिषद हिंदु मंदिरांच्या स्वायत्ततेसाठी सातत्याने आवाज उठवत असून मंदिर व्यवस्थापनाविषयी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर परिसरात बुरशीयुक्त पेढ्यांची विक्री !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ