नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !

आयुक्त तुकाराम मुंडे यांचे कडक आदेश


मुंबई –
ज्या औषधालयांमध्ये नोंदणीकृत औषधविक्रेते उपस्थित नसतील, तर अशी दुकाने त्वरित बंद करण्यात यावीत, असे कडक निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. नियमांनुसार औषधांची विक्री करतांना औषधविक्रेत्याची उपस्थिती अनिवार्य आहे; मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत. त्याची गंभीर नोंद घेत आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. नियमांचे वारंवार उल्लंघन करणार्‍या दुकानदारांचे परवाने रहित करण्यापर्यंतची कारवाई केली जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

  • आयुक्तांचा स्तुत्य निर्णय !
  • अशाने औषधविक्रीतील गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवता येईल !