‘लव्ह जिहाद’ची भयावहता आणि त्यांवरील उपाययोजना यांवर विशेष व्याख्यान !

कोल्हापूर, ९ जून (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे. ‘लव्ह जिहाद’ला रोखायचे असेल, तर युवती-महिला यांना संस्कृती आणि हिंदु धर्म यांचे निष्ठेने पालन करावे लागेल. विरांगनांनी मरण पत्करले, जोहार स्वीकारला; पण यवनांच्या हाती लागल्या नाहीत. त्या विरांगनांचा आदर्श ठेवावा लागेल. धर्माचरण केले आणि धर्माभिमान जोपासला, तर संपूर्ण भारतातील एकही मुलगी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसणार नाही, असे ठाम प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे ‘लव्ह जिहाद’वर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘हिंदु संस्कृती पुरुषसत्ताक आहे, अशा प्रकारे हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’सुद्धा (खोटे कथानक) मोठ्या प्रमाणावर पसरवले गेले. प्रत्यक्षात या सगळ्या ‘नॅरेटिव्हज्’मध्ये एक अंशही तथ्य नाही. नाशिकला ‘टी.सी.एस्.’ आस्थापनामध्ये धर्मांतराचे ‘रॅकेट’ उघडकीला आले. मुंबईच्या स्टेट बँकेत आणि गेल्या आठवड्यात पुण्याच्या विप्रो आस्थापनातही अशा प्रकारची घटना उघडकीला आली.’’

या कार्यक्रमात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे प्रतिनिधी कार्यकर्ते, युवती-महिला यांसह ३०० जणांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले. सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान सौ. आरती ठोमके यांनी केला, तर श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार ‘कोल्हापूर इंजिनिअरिंग’चे संचालक श्री. बाबासाहेब कोंडेकर यांनी केला.
‘समितीच्या वतीने ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियान चालू करण्यात आले आहे. हे अभियान हिंदु मुलींच्या सुरक्षिततेसाठी आहे. अभियानाच्या अंतर्गत जनजागृतीसाठी व्याख्याने आणि उपक्रम राबवण्यात येत असून अभियानाचे सदस्य बना’, असे आवाहन समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
‘लव्ह जिहाद’ हे हिंदु संस्कृती आणि हिंदु धर्म संपवण्याचे मोठे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वर्ष ७११ मध्ये महंमद बिन कासीमने आक्रमण करून हिंदु राजा दाहिरच्या मुलींचे अपहरण केले, तेव्हापासून ‘लव्ह जिहाद’ चालू झाला. हिंदु महिला आणि युवती यांच्यावर झालेले अत्याचार तेव्हापासून आतापर्यंत चालूच आहेत. ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु संस्कृती, हिंदु धर्म संपवण्याचे मोठे षड्यंत्र आहे.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला वर्ष २०४७ पर्यंत भारतात ‘दार उल् इस्लाम’ म्हणजे इस्लामचे शासन आणायचे असून त्यासाठी त्यांनी ‘गझवा-ए-हिंद’ (संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न) चालू केले आहे. हिंदू वंशावळ संपवणे, मुसलमानांसाठी नवीन ‘डी.एन्.ए.’ (डी.एन्.ए. म्हणजे डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) निर्माण करणे, जगावर राज्य करण्यासाठी लोकसंख्या वाढवण्यासाठी मुलींना फसवणे यांसाठी ‘लव्ह जिहाद’ केला जातो. या विरोधात हिंदूंनी जागरूक होऊन कृती करण्याची आवश्यकता आहे.
‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
हिंदु देवतांची विटंबना करणार्या ख्रिस्ती परिचारिकेच्या विरोधात गुन्हा नोंद !