
मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – अधिवेशनात शासनाकडून १० विधेयके मांडली आहेत; मात्र सभागृहाचा वेळ केवळ ६ घंटे आहे. यामध्ये सर्व विधेयकांवर चर्चा कशी करणार ? त्यासाठी विधीमंडळाच्या कामकाजाची नियमावली निश्चित करावी, अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. या वेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पुढील अधिवेशन अधिक वेळ घेऊ.
या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘सत्ताधारी पक्षाने पत्रकार परिषदेत सर्व विधेयकांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले; मात्र एवढ्या अल्प वेळेत १० विधेयकांवर चर्चा कशी काय होणार ? याविषयी अधिवेशनाचा कालावधी वाढवणार कि यांतील कोणत्या विधेयकांवर चर्चा होणार ? हे लोकशाहीला बेशुद्ध करणारे आहे. याविषयी शासनाने स्पष्ट करावे. त्यानुसार विरोधक अभ्यास करून विषय मांडतील.’’
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !