
नवी देहली – देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यानी दिली. या साठ्यामध्ये पेट्रोलियम साठा, रिफायनरी साठा आणि व्यावसायिक साठा यांचा समावेश आहे.
ते पुढे म्हणाले की, मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशाचा तेल पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती फार काळ उच्च पातळीवर रहाणार नाहीत. तथापि मध्यपूर्वेतील संघर्ष अपेक्षेपेक्षा अधिक काळ चालला, तर आव्हाने पालटू शकतात. त्यामुळे सरकारी तेल आस्थापने दीर्घकालीन सुरक्षेसाठी उपाययोजना काढण्यावर काम करत असून त्याद्वारे आपले इंधनावरील अवलंबित्व अल्प होईल.
तेल आस्थापनांची प्रतिदिन होत आहे ६०० ते ७०० कोटी रुपयांची हानी ! – प्रवीण खनुजा
पेट्रोलियम मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, एल्.पी.जी. व्यतिरिक्त तेल कंपन्यांना सध्या डिझेलवर प्रति लिटर ३० रुपये आणि पेट्रोलवर प्रति लिटर ६ रुपये (एकूण ६०० ते ७०० कोटी रुपये) इतकी हानी सोसावी लागत आहे.
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती ! – डॉनल्ड ट्रम्प
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !