गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजप नेत्याच्या घरावर इडीने धाड टाकली का ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट.., भाजपवाल्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे मग त्यांची चौकशी का नाही ?, असे प्रश्‍न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधार्‍यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील, तर आम्ही पर्वा करत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रतिदिन राबवून ईश्‍वराची कृपा संपादन करूया, असे प्रतिपादन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

मोरजी (गोवा) येथील अनेक भूखंड देहली येथील बांधकाम व्यावसायिक आणि रशियाचे नागरिक यांच्या कह्यात !

मोरजीतील भूखंड परप्रांतीय आणि विदेशी यांच्या कह्यात जात असतांना स्वतःला ‘गोमंतकियांसाठी झटणार्‍या’ म्हणणार्‍या संघटना गप्प का ?

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येत आहे.

भरमसाठ वीजदेयक आकारल्याच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यभर वीजदेयकांची होळी

कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असतांना दळणवळण बंदीच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजदेयके दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभर वीजदेयकांची होळी करण्यात आली.

राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श समोर ठेवून स्वतःतील शौर्य जागृत करा ! – कु. सरिता मुगळी

आजची युवा पिढी स्वैराच्या नावाखाली स्वतः गुलामगिरीत अडकत आहे. सध्याची निधर्मी शिक्षणव्यवस्था आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांच्यामुळे अनेक युवती ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रात अडकून देशद्रोही कृत्ये करत आहेत.

गोव्यात कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटक आल्यामुळे गोमंतकियांना धोका !

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !

भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवि गोव्यात : म्हादईवर भाष्य करण्यास नकार

गोवा शासनाने म्हादई प्रश्‍नी कर्नाटक राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .