पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेतांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून बडगे यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.

प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन यांसाठी शासन १०१ कोटी रुपयांची तरतूद करणार

राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवंर्धन यांसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यास संमती देण्यात आली होती.

कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यावर गावकर्‍यांनी ७०० कोंबड्या पळवल्या !

पूर्वीच्या काळात लोक धर्माचरणी असल्याने त्यांच्या मनात चोरीचा विचारही येत नव्हता!

संभाजी बिग्रेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर २ वर्षांसाठी ४ जिल्ह्यातून हद्दपार !

शासकीय कर्मचार्‍यांकडे खंडणी मागणारा संभाजी ब्रिगेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (तालुका -वाळवा) याला २ वर्षांसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ४ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील भाजपच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबईमध्ये भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देण्यात आला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शेती प्रश्‍नांविषयी केंद्र सरकारला पुन्हा आंदोलनाची चेतावणी

सर्वच पक्ष स्वार्थी असून ते केवळ आपल्या पक्षाचे हित पहातात. त्यांना खरोखरच समाजाविषयी तळमळ असती, तर आज सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, हे काय त्यांना दिसत नाही का ? असा प्रश्‍न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नूतन वर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी’ ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातून जागृती

‘हिंदु धर्म अन् संस्कृती यांवर होत असलेले आघात आणि ते आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवण्याची आवश्यकता’

पुण्यात अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना अटक

कोंढवा बुद्रुक परिसरातील अ‍ॅमेझॉनच्या गोदामात ‘मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही’ अशा घोषणा देत तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिर्डीतील साईमंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर चालू रहाणार !

नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर चालू ठेवण्यात येत असते. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीसुद्धा शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर चालू रहाणार आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या वतीने देण्यात आली.

राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ

राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या लागू असलेली नियमावली ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला केला आहे.