सनातनच्या आश्रमात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या एकसारख्याच असणार्‍या छायाचित्रांच्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात दोन ठिकाणी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या एकसारख्याच असणार्‍या छायाचित्रांच्या संदर्भात घेतलेल्या प्रयोगाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे

प.पू. भक्तराज महाराज यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असणारे छायाचित्र (अ) आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात असणारे तसेच छायाचित्र (आ) ही २ छायाचित्रे प्रयोगासाठी ठेवण्यात आली होती. प्रयोग करणार्‍या साधकांना ती छायाचित्रे कुठली आहेत, हे ठाऊक नव्हते. एकूण १२४ साधकांनी प्रयोग केला. त्या वेळी त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांमध्ये जाणवलेले पालट

पू. देयान ग्लेश्चिच, युरोप

पू. देयान ग्लेश्‍चिच

१. छायाचित्र (अ) : ‘मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवला आणि थोड्या प्रमाणात शांती जाणवली.

२. छायाचित्र (आ) : या छायाचित्रातून मला साधना करण्याची प्रेरणा आणि उत्साह मिळून आनंद जाणवला.’ (३१.८.२०२१)

पू. (सौ.) योया सिरियाक वाले

१. छायाचित्र (अ) : ‘या छायाचित्राकडे पाहून नेहमीप्रमाणे मला भाव, शक्ती आणि शांती यांची संमिश्र स्पंदने जाणवली. मला या छायाचित्राभोवती अल्प प्रमाणात आवरण असल्याचे जाणवले.

२. छायाचित्र (आ) : ‘या छायाचित्राकडे पाहून मला उत्साह आणि आनंद जाणवला. हे छायाचित्र सजीव जाणवून मला त्यात पुष्कळ चैतन्य जाणवले. प.पू. बाबांचा श्वासोच्छ्वास चालू आहे आणि ते डोळ्यांतून माझ्याशी बोलत आहेत. त्यांच्या मुखकमलाभोवती असलेली प्रभावळ अधिक प्रकाशमान आणि मोठी दिसत असून ती पसरत आहे. प.पू. बाबा ध्यानावस्थेत आणि निर्गुण स्थितीत असून त्यांच्याकडून दिव्य ज्ञान प्रक्षेपित होत आहे. हे छायाचित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील असावे’, असे मला जाणवले. या छायाचित्रातून मला आध्यात्मिक उपाय झाले.’ (३१.८.२०२१)

पू. (सौ.) योया वाले

१. ‘बर्‍याच साधकांना ‘आ’ हे छायाचित्र ‘निर्गुण’ आहे’, असे जाणवले.

२. बहुतेक साधकांना ‘अ’ च्या तुलनेत ‘आ’ या छायाचित्रात अधिक जिवंतपणा जाणवला.

३. प्रयोगात सहभागी असणार्‍या साधकांना ‘अ’ या छायाचित्राच्या तुलनेत आ’ या छायाचित्राकडे पाहून अधिक चांगले वाटले.

३ अ. सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधक

सुश्री (कु.) युवराज्ञी शिंदे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)

छायाचित्र (आ) : ‘यामध्ये आताच्या काळानुरूप जे चैतन्य आवश्यक आहे, ते देणारे हे छायाचित्र आहे. डोळे मिटल्यावरही यातून प्रकाश जाणवतो.’

सौ. मंजिरी चव्हाण

छायाचित्र (आ) : ‘यामधून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले. ‘हे छायाचित्र संतांच्या खोलीतील असावे आणि संतांमधील चैतन्य अन् भाव यांमुळे या छायाचित्रात दैवी चैतन्याच्या स्तरावर पालट झाला असावा’, असे मला वाटले. तेव्हा गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण अधिक होऊन अनाहतचक्रावर संवेदना जाणवल्या.’

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले

छायाचित्र (आ) : ‘यामध्ये प.पू. बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज यांचा) आकार मोठा जाणवतो. त्यांचा तोंडवळा, हात आणि काठीचा भागही चैतन्यामुळे पिवळा दिसतो. मला हे छायाचित्र फार सजीव वाटले. ‘प.पू. बाबा प्रत्यक्ष आपल्याकडे पहात असून आपल्याशी प्रेमाने बोलत आहेत आणि त्यांच्या प्रभावळीतून शांतीची स्पंदने सर्वत्र पसरत आहेत’, असे मला जाणवले.’

कु. वनिता शिरगावकर

छायाचित्र (आ) : ‘यामध्ये चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले असल्याचे जाणवते. छायाचित्रातील पिवळी आणि हिरवी छटा वाढली आहे. प.पू. बाबांच्या डोक्यामागील पांढरी प्रभावळ आणि छायाचित्राचा तेजस्वीपणा वाढला आहे. या छायाचित्रातून चैतन्य मिळून मला हलके वाटले.’

कु. रुचिता जाधव

छायाचित्र (आ) : ‘यामध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या मागील प्रभावळ आणि त्यांच्या तोंडवळ्यावरील तेज अधिक जाणवले. मला ते छायाचित्र सजीव वाटले.’

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत

छायाचित्र (अ) : ‘यामध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व अप्रकट, तर छायाचित्र ‘आ’मध्ये तुलनेने प्रकट जाणवले.’

३ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे जगभरातील साधक

श्री. शॉन क्लार्क, (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), भारत

१. छायाचित्र (अ) : ‘या छायाचित्रात अप्रकट शक्ती आहे’, असे मला जाणवले.

२. छायाचित्र (आ) : ‘हे छायाचित्र अधिक सजीव असून त्यात प्रकट शक्ती अधिक प्रमाणात आहे’, असे मला जाणवले.’

सौ. श्वेता शॉन क्लार्क, भारत

१. छायाचित्र (अ) : ‘मला या छायाचित्रात दैवी मारक तत्त्व आहे’, असे जाणवले.

२. छायाचित्र (आ) : या छायाचित्रात चैतन्य आणि आनंद जाणवला. ‘हे छायाचित्र सजीव असून ते निर्गुणाकडे जात आहे’, असे मला जाणवले.’

सौ. रिशिता गडोया, भारत

१. छायाचित्र (अ) : ‘मला प.पू. बाबांचे मुखकमल प्रेमळ दिसले, जणू त्यातून प्रीतीचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.

२. छायाचित्र (आ) : या छायाचित्राकडे पहातांना ‘प.पू. बाबा माझ्याकडे पहात असून त्यांच्या डोळ्यांची हालचाल होत आहे. हे छायाचित्र त्रिमितीत असून प.पू. बाबा जिवंत आहेत आणि ते माझ्याकडे पाहून स्मित करत आहेत’, असे मला जाणवले. प्रयोग केल्यानंतर माझ्या मनातील विचारांचे प्रमाण घटले आणि माझा श्वासोच्छ्वास मंद गतीने होऊ लागला. मी त्या छायाचित्राकडे ओढली जात होते; परंतु त्यातील चैतन्यामुळे मी त्या छायाचित्राकडे अधिक वेळ पाहू शकत नव्हते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ३१.८.२०२१)

श्री. अनिकेत धवस, भारत

१. छायाचित्र (अ) : ‘मला या छायाचित्रात जिवंतपणा जाणवून मला तिथे प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले.

२. छायाचित्र (आ) : ‘या छायाचित्रातून अधिक प्रमाणात चैतन्य आणि शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’

श्री. वाम्सी कृष्णा, भारत

१. छायाचित्र (अ) : ‘हे छायाचित्र त्रिमितीत असून ‘प.पू. बाबा श्वासोच्छ्वास करत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्याकडून प्रीतीची स्पंदने येतांना जाणवून माझी भावजागृती झाली.

२. छायाचित्र (आ) : ‘माझ्या सहस्राराच्या ठिकाणी संवेदना जाणवून तेथून शक्ती आत जात आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर मला पुष्कळ हलके वाटले.’

सुश्री (कु.) शिरीन चाईना, भारत

छायाचित्र (अ) : ‘मला हे छायाचित्र अधिक गंभीर वाटले. ते गुलाबीसर दिसून मला त्यात भाव जाणवला.

छायाचित्र (आ) : मला या छायाचित्रात पुष्कळ प्रमाणात चैतन्य जाणवले. त्यांच्या मुखकमलाभोवती असलेली प्रभावळ अधिक पांढरी दिसली. मला त्यांचे मुखकमल पिवळसर दिसून ‘ते निर्गुणाकडे जात आहे’, असे जाणवले.

प.पू. बाबांचे हास्य आणि डोळे यांत पुष्कळ प्रीती जाणवत होती. ‘ते आता बोलतील’, असे वाटण्याएवढे त्यांचे छायाचित्र सजीव जाणवले. त्यांच्या हातातील काठी खरी वाटत होती. त्यांच्या कपड्यांवर भावाची निळसर छटा दिसून ते पुष्कळ आनंदी दिसत होते. मला त्यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांच्या मिशा खर्‍या वाटत होत्या. मला ‘तेथून जाऊच नये’, असे वाटत होते. मला माझ्या मणिपूरचक्राच्या ठिकाणी थोडी हालचाल जाणवली.’

२. सौ. योगिता चेऊलकर, भारत

छायाचित्र (अ) : ‘मला प.पू. बाबांचे हे छायाचित्र सजीव जाणवत होते. ‘या छायाचित्रातून प्रक्षेपित होणारा पांढरा प्रकाश आणि सकारात्मक स्पंदने माझ्या आतमध्ये जात आहेत. या छायाचित्रातून पुष्कळ प्रमाणात प्रीती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.

छायाचित्र ( आ ) : मला या छायाचित्रामध्ये जिवंतपणा जाणवला.’

सौ. शरण्या देसाई, भारत

छायाचित्र (अ) : ‘मला या छायाचित्रात जिवंतपणा जाणवला. त्यानंतर मला अस्वस्थता जाणवल्यामुळे मी त्या छायाचित्राकडे अधिक वेळ पाहू शकले नाही. हे छायाचित्र अधिक सगुण स्तरावर होते.

छायाचित्र (आ) : ‘हे छायाचित्र निर्गुणाकडे जात आहे’, असे मला जाणवले.’

श्री. कीर्ती नल्लूर, न्यूझीलंड

छायाचित्र (अ) : ‘या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला भाव आणि आनंद जाणवला. माझा श्वासोच्छ्वास दीर्घ आणि मंद गतीने होत होता.

छायाचित्र (आ) : ‘छायाचित्रातून पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’ साधारण १ – २ मिनिटे, म्हणजे मी छायाचित्राकडे पहात होतो, तोपर्यंत माझा आध्यात्मिक त्रास वाढत असल्याचे जाणवले.’

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक