‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केल्यावर एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती आणि अनुभवलेले पालट

‘१८.६.२०१९ या दिवशी ‘कार्यशाळेएस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आयोजित करण्यात आलेल्या अर्ध्या दिवसाच्या आध्यात्मिक कार्यशाळेला एक जिज्ञासू उपस्थित होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने साधकांना भेटण्यासाठी चारचाकीने प्रवास करून आले होते. या प्रवासात आणि कार्यशाळेच्या कालावधीत मधेमधे त्यांचा भाव जागृत होत होता. च्या शेवटी  त्यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. ते त्यांच्याच शब्दांत देत आहोत.’ – (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (२१.६.२०१९)

सद्गुरु सिरियाक वाले

  १. पूर्वी अनिष्ट शक्तींमुळे एकाग्रतेचा अभाव, विसरणे इत्यादी विविध त्रास होणे आणि त्यांचा नकारात्मक परिणाम दैनंदिन जीवनावर होऊन अनेक समस्या उद्भवणे

‘पूर्वी मला अनिष्ट शक्तींचे पुष्कळ त्रास होते. या त्रासांची सूची मोठी असल्याने त्यांपैकी काही त्रास मला आठवतही नाहीत. मला ‘लक्ष एकाग्र करता न येणे, विसरणे आणि महिलांविषयी आकर्षण वाटणे’, यांसारखे त्रास होत असत. त्यांचा नकारात्मक प्रभाव माझ्या जीवनावर होत होता.

२. पूर्वजांच्या त्रासामुळे आर्थिक अडचणी येणे अन् दत्ताचा नामजप केल्यावर ‘विनाकारण निराशा येणे, दुःखी होणे आणि निद्राविकार’ यांसारखे काही त्रास दूर होणे

मला पूर्वजांच्या तीव्र त्रासामुळे पुष्कळ आर्थिक समस्या होत्या आणि त्या दूर होत नव्हत्या.  मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास आरंभ केल्यावर या समस्या हळूहळू दूर होऊ लागल्या. मी दत्ताचा नामजप करायला आरंभ केल्यावर विनाकारण निराश आणि दुःखी होणे, रात्री झोप न आल्यामुळे उशिरापर्यंत जागून दूरचित्रवाणी पहाणे, यांसारख्या माझ्या समस्या नष्ट झाल्या. माझा ‘निद्राविकारा’चा त्रास तर पुष्कळ जुनाट होता; पण दत्ताच्या नामजपाने ही समस्यादेखील दूर झाली.

३. साधनेत चिकाटी आणि त्याग महत्त्वाचा असल्याचे लक्षात येणे

साधनेत चिकाटी आणि संयम पुष्कळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘साधना करण्यासाठी मला शक्ती दे’, अशी देवाकडे प्रार्थना करायला हवी; कारण आध्यात्मिक प्रगती सहज घडून येत नाही. त्यासाठी काहीतरी मूल्य चुकवावेच लागते. आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी साधकाला स्वतःचा वेळ, शक्ती आणि अहं यांचा त्याग करावा लागतो. साधकाने सर्वस्वाचा त्याग केल्यावरच त्याला सर्वकाही मिळते.

४. साधनेपूर्वीचे जीवन आणि साधनेनंतर झालेले पालट

४ अ. पूर्वी व्यावहारिक सुखाची इच्छा पूर्ण न झाल्याने निराशा येणे आणि साधना करू लागल्यावर ईश्‍वराकडून मिळणारा आनंद अनुभवणे : आजच्या जगात अनेक लोक, विशेषतः तरुणवर्ग हा मायेतील विविध गोष्टीत गुंतलेला आहे. हा वर्ग पुष्कळ महत्त्वाकांक्षी असल्याने त्याला पुष्कळ व्यावहारिक इच्छा आहेत. तरुण असतांना मलाही पुष्कळ व्यावहारिक इच्छा-आकांक्षा होत्या आणि त्या पूर्ण करणे शक्य न झाल्याने मी पुष्कळ निराश झालो होतो. आता मागे वळून पहातांना मला ‘जे झाले, ते योग्य होते’, असे वाटते; कारण त्यामुळे मी साधना करू लागलो आणि मला आनंद मिळाला. व्यावहारिक सुख आणि साधनेतील आनंद या दोन्ही गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. साधनेमुळे ईश्‍वराकडून मिळणारा आनंद पुष्कळ वेगळा आहे.

४ आ. साधना करू लागल्यावर अनावश्यक खाण्या-पिण्याची सवय न्यून होणे : पूर्वी मला चांगले खाण्या-पिण्यात पुष्कळ रस होता. मला कंटाळा आला की, मला खाण्याची इच्छा होत असे. अनावश्यक खाण्यामुळे मला त्रास होत असे. आता (म्हणजे साधना करू लागल्यापासून) मी जेवढे अन्न आवश्यक आहे, तेवढेच खातो आणि ‘पदार्थ चवीला चांगलेच असायला हवेत’, असा माझा आग्रहही नसतो. मी साधना करण्यासाठी आवश्यक तेवढेच अन्न खातो.

४ इ. साधनेमुळे चिंतन होऊन स्वतःत पालट घडवण्याचा प्रयत्न करणे : ‘कोणावरही विरक्तीची सक्ती करता येत नाही. विरक्ती अंतर्मनातून यायला हवी’, असे मला वाटते. माझ्यात संयम नसल्यामुळे ‘इतर उन्नत साधकांप्रमाणे जलद आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असे मला वाटत असे. असे उन्नत साधक मला आदर्शवत असल्याने मी सत्संगात त्यांच्याशी बोलत असे. ‘आपण जसे आहोत, तसे (गुणदोषांसकट) स्वतःला स्वीकारल्यास आणि प्रत्येक क्षणी प्रत्येकाविषयी कृतज्ञतेची जाणीव ठेवल्यास आध्यात्मिक प्रगती होते’, हे मला शिकायला मिळाले. साधना म्हणजे काहीतरी जिंकून घेणे नाही, तर प्रत्येक क्षणी ईश्‍वराला अनुभवणे आहे. ‘आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे’, याचा विचार करायला हवा. मला स्वतःत हा पालट घडवायला पुष्कळ प्रयत्न करावे लागले; पण आता ते मला जमले आहे.

४ ई. पूर्वी स्वभावदोष निर्मूलनासाठी समयमर्यादा घालून घेणे आणि त्या कालावधीत ते दूर न झाल्यास ताण येणे, आता ‘दोष जाण्यासाठी स्वतःला ताण देऊन हार मानण्यापेक्षा ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून त्याला शरण जायला हवे’, हे लक्षात येणे : पूर्वी मला रात्री झोपेत भयानक स्वप्ने पडत असत. मी पुष्कळ उपाय करूनही अशी स्वप्ने पडणे थांबले नाही. (हीच माझी समस्या होती.) माझ्यासारखे असे कित्येक लोक असतील, उदा. मला शांती हवी होती. मी ती मिळवण्यासाठी (प्रयत्न करतांना) स्वतःवर समयमर्यादा घालून घेतली होती. ‘राग येणे’ या दोषावर मला ८ आठवड्यांत मात करायची होती. माझ्या या स्वभावामुळे मला ताण येत असे आणि समस्या आणखी जटील होत असे. आता ‘(प्रयत्नांच्या अपेक्षित फलप्राप्तीसाठी) स्वतःला ताण देऊन हार मानण्यापेक्षा ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून त्याला शरण जायला हवे’, हे माझ्या लक्षात आले.

४ उ. प्रारब्धभोगांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाणे : ‘प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, तसेच प्रत्येकाचे प्रारब्ध निराळेे असते’, हे सूत्र आपण लक्षात घ्यायला हवे. पुष्कळ लोक ‘प्रारब्धभोग म्हणजे देवाने दिलेली शिक्षा आहे’, असे मानतात; पण प्रत्यक्षात तसे नसते. आयुष्यात घडणार्‍या घटनांमागील कार्यकारण भाव समजून घेतल्यास, तसेच ‘ईश्‍वर म्हणजे काय ?’, हे समजून घेतल्यास आपल्याला सकारात्मक रहाता येते अन्यथा आपल्यात नकारात्मकता निर्माण होऊ शकतेे. त्यामुळे आशा संपुष्टात येते. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाण्यासाठी आशा अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची आहे.

५. आध्यात्मिक त्रास आणि त्यांवर उपाय

५ अ. आध्यात्मिक त्रासांमुळे जीवनात पुष्कळ हानी होत असल्याचे अनुभवणे : मी माझ्या जीवनात विविध त्रासांना सामोरे गेलो आहे. सध्या मला होणार्‍या त्रासांचे प्रमाण पुष्कळ उणावले असले, तरी ते संपूर्णपणे नष्ट झालेले नाहीत. आध्यात्मिक त्रासामुळे कुणामध्ये न मिसळण्यामुळे हे सर्व मला पुष्कळ कठीण होते. कित्येक लोकांना असे वाटते, ‘वयस्कर माणसे कोणात फारशी मिसळत नसल्याने त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो; परंतु हे आध्यात्मिक त्रास असलेल्या तरुणांच्या संदर्भातही घडू शकते, असा माझा स्वानुभव आहे. त्यामुळे ‘तरुणांच्या संदर्भात असे होत नाही’, असे समजणे योग्य नाही. अशा प्रकारच्या त्रासामुळे जीवनात पुष्कळ हानी होते.

५ आ. जीवनातील विविध समस्या आध्यात्मिक त्रासांमुळे होत असल्याने नामजपादी उपचारांविना अन्य उपचारांनी त्या पूर्णपणे बर्‍या न होणे : आध्यात्मिक त्रास हे प्रत्येक वेळी मानसिक पातळीवरच असतील, असे नाही. मी हे त्रास नष्ट व्हावेत; म्हणून विविध उपचारकर्त्यांकडे जाऊन एक प्रकारे स्वतःचा छळ करून घेतला होता. कोणताही तज्ञ माझी समस्या पूर्णपणे बरे करू शकला नाही; कारण माझ्या समस्यांमागे आध्यात्मिक कारण होते.

६. विविध संप्रदायांनुसार साधना करूनही आध्यात्मिक प्रगती न होणे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संपर्कात आल्यावर ‘ज्याच्या शोधात होतो’, ते सापडणे

मी विविध आध्यात्मिक संस्थांमध्ये मार्गदर्शनाला जात असे; पण त्यांच्यामध्येही सांप्रदायिकता आहे. तेथे साधनेच्या ६ मूलभूत तत्त्वांनुसार मार्गदर्शन होत नसल्याने तेथे जाऊनही माझी आध्यात्मिक उन्नती होऊ शकली नाही; परंतु ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संपर्कात आल्यावर मी ज्याच्या शोधात होतो, ते मला मिळाले.’

–  एक जिज्ञासू, नेदरलँड (३०.६.२०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक