‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा डिसेंबर २०२१ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा

१ अ. विविध सामाजिक माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या (डिसेंबर २०२१ या मासातील)

१ आ. विविध माध्यमांतील सदस्यांची संख्या (डिसेंबर २०२१ पर्यंतची)

१ इ. ‘ऑनलाईन’ प्रसार : या मासात ‘फेसबूक’, ‘पिंटरेस्ट’, ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘ट्विटर’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून १५ सहस्र ३२ जिज्ञासूंनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.

सद्गुरु सिरियाक वाले

२. संकेतस्थळावरील लेख जगातील ७ भाषांमध्ये !

डिसेंबर २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर तमिळ, हिंदी, नेपाळी, चिनी, इंडोनेशियन, इटालियन, फ्रेंच, रशियन, सर्बियन आणि क्रोएशियन, या १० भाषांमधील एकूण ५५ लेख ठेवण्यात आले.

३. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)

याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच, इंडोनेशियन आणि रशियन, या ७ भाषांतील १ सहस्र १४३ वाचकांशी संवाद साधता आला.

४. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् त्यांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !

अ. डिसेंबर २०२१ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाईन’ १३ व्याख्याने अन् ३ कार्यशाळा घेण्यात आल्या. १ सहस्र ७९९ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर २२ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.

आ. डिसेंबर २०२१ मध्ये सद्गुरु सिरियाक वाले यांनी ३ ‘ऑनलाईन’ नामजप सत्रे घेतली. यांचा एकूण ५२३ साधक आणि जिज्ञासू यांनी लाभ घेतला.

५. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

६. जगभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप १) १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.

(टीप १ – जगभरातील एकूण देशांची संख्या : सध्या जगभरात एकूण १९५ देश आहेत. त्यांतील १९३ देश ‘संयुक्त राष्ट्रा’चे सदस्य आहेत. २ देश (‘होली सी’ आणि ‘स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’) संयुक्त राष्ट्रात केवळ पर्यवेक्षक आहेत, म्हणजे ‘संयुक्त राष्ट्रा’च्या बैठकांना पर्यवेक्षक म्हणून बसू शकतात. या व्यतिरिक्त ‘संयुक्त राष्ट्रा’च्या ११ व्या सनदी अध्यायात १७ स्वयंशासित नसलेले प्रदेश आहेत. तेथील लोकांना अजून स्वतःचे शासन प्रमाणित केलेले नाही. ‘संयुक्त राष्ट्रा’च्या काही सदस्य देशांकडे अशा प्रदेशांचे प्रशासकीय अधिकार आहेत.)

श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (जानेवारी २०२२)