आजच्या तरुणांकडे पहातांना असे लक्षात येते की, त्यांना सर्व गोष्टींची घाई झालेली आहे. त्यांना सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळवायच्या आहेत. जगातील महागातील महाग गोष्टी त्यांच्याकडे असल्या पाहिजेत आणि त्याचे सामाजिक माध्यमांवर प्रदर्शन केले की, त्यांना सुखी असल्यासारखे वाटते. मुलांचे वागणे, बोलणे, कपडे परिधान करणे, उत्सव साजरा करणे, नातेसंबंध सांभाळणे, सण समारंभ साजरे करणे या सर्व गोष्टी बघितल्यास त्यातून पुढील २ निष्कर्ष लक्षात येतात.
अ. पहिला म्हणजे तरुणांच्या समोर सध्या जीवनातील काही मोठे ध्येय नाही. ज्याला आपण ‘लार्जर गोल इन द लाईफ’ असे म्हणतो.
आ. दुसरा निष्कर्ष म्हणजे त्यांच्यासमोर ‘रोल मॉडेल’ (आदर्श) म्हणून कुणीच नाही.
(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०२३)