‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर सवंग प्रसिद्धीसाठी सामाजिक माध्यमांत लिखाण प्रसारित करतात आणि तोंडघशी पडतात. काही वेळा त्यांनी महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाची खात्री न करता श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे ते सामाजिक माध्यमांत कायम टीकेचे धनी बनतात. आता केरळचा उदो उदो करण्याच्या नादात शशी थरूर पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत.
‘केरळमध्ये पुस्तकांचे गाव उभारण्यात आले आहे’, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहे. हे गाव ‘देशातील पहिले पुस्तकांचे गाव’ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ६ वर्षांपूर्वीच ‘भिलार’ हे गाव ‘पुस्तकांचे पहिले गाव’ म्हणून उभारण्यात आले आहे.