Gyanvapi Verdict : ज्ञानवापी खटल्यात न्यायाचे उद्दिष्ट पूर्ण करूनच निर्णय दिला ! – निवृत्त न्यायाधीश अजय कृष्ण विश्‍वेश

डावीकडे निवृत्त न्यायाधीश अजय कृष्ण विश्‍वेश

वाराणसी –  जोपर्यंत मी न्यायालयीन सेवेत राहिलो, तोपर्यंत मी माझे काम पूर्ण निष्ठेने आणि कष्टाने केले. ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजेला अनुमती देण्याविषयी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन हा आदेश काढण्यात आला.  न्यायाचे उद्दिष्ट पूर्ण करूनच निर्णय देण्यात आला, असे जिल्हा न्यायाधीश पदावरून नुकतेच निवृत्त झालेले अजय कृष्ण विश्‍वेश यांनी सांगितले. ज्ञानवापीच्या तळघरात हिंदु पक्षकारांना पूजा करण्याची अनुमती त्यांनीच दिली होती. हा निकाल त्यांच्या कार्यकाळातील अंतिम निकाल होता. ३१ जानेवारी या दिवशी त्यांनी हा निकाल दिला आणि नंतर ते सेवानिवृत्त झाले.

सौजन्य : कडक 

निवृत्त न्यायाधीश अजय कृष्ण विश्‍वेश म्हणाले की,

१. मी न्यायिक सेवेत असतांना न्याय देण्याच्या उद्देशाने निवाडे दिले आणि त्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. पुराव्याच्या आधारे निर्णय घ्यावा, हे मी लक्षात ठेवले.

२. न्यायालय ज्यांच्या बाजूने निर्णय देते ते हसत हसत निघून जातात आणि ज्यांच्या विरोधात निर्णय होतो, ते विरोध करू लागतात. जे काही निर्णय दिले जातात ते कागदपत्रे आणि पुरावे यांवर आधारित असतात.