शेतकरी आंदोलनातील नेते बलदेव सिंह सिरसा यांची एन्.आय.ए.कडून चौकशी होणार

एन्.आय.ए.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून सामाजिक संघटनांना होणारा अर्थपुरवठा यांची सूची बनवली आहे. या सामाजिक संघटना विदेशातून मिळालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी व्यय (खर्च) करत असल्याची माहिती मिळाली आहे.  

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने माघार घेत अटी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने ४ जानेवारीला त्याच्या नव्या सेवा अटी (टर्म ऑफ सर्व्हिस) घोषित करत त्याची कार्यवाही ८ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे घोषित केले होतेे. या सेवा अटी न स्वीकारणार्‍याचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ डिलीट होणार आहे, असे यात म्हटले होते.

आज पणजी येथे ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून चालू होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (‘आंचिम’चे) कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि गायक सुदीप संजीव आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.

दिव्यांगांनाही (विकलांगांनाही) आनंद देण्यासाठी ‘हेल्पडेस्क’

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद दिव्यांग (विकलांग) व्यक्तींनाही घेता यावा यासाठी ‘आंचिम’मध्ये दिव्यांगांसाठी खास ‘हेल्पडेस्क’ कार्यरत असेल, तसेच यंदा ‘एक्सेसिबल इंडिया-एक्सेसिबल चित्रपट’ या विभागात ३ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार करणार्‍या महिलेची माघार

राष्ट्रवादीचे नेते आणि  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार करणार्‍या महिलेने आपण माघार घेत असल्याचे टि्वट केले आहे. या महिलेने टि्वटमध्ये म्हटले आहे की, तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते आहे. एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या.

(म्हणे) ‘१५ वर्षांची मुलगीही आई होऊ शकते, तर विवाहाचे वय वाढवण्याची आवश्यकता काय ?’ – काँग्रेसचे नेते सज्जनसिंह वर्मा यांचे विधान !

‘मुली केवळ मुले जन्माला घालण्यासाठी असतात’, असे काँग्रेसवाल्यांना वाटते’ ! अशा संकुचित विचारांच्या काँग्रेसवाल्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे !

राज्यपाल आणि आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा शुभारंभ !

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशात १५ जानेवारीपासून निधी संकलन मोहीम आखण्यात आली आहे.

पुणे येथील डॉक्टर महिलेकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या खंडणीखोराला अटक 

अशाप्रकारे धमकी दिली जाण्यास गुन्हेगार धजावतात यावरून त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. असा धाक निर्माण होण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित कठोर शिक्षा होऊन त्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

चार हुतात्मा पुतळ्यांची दुरवस्था झाल्याप्रकरणी संभाजी आरमारचा महापालिकेत ठिय्या

हुतात्म्यांच्या पुतळ्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष नाही, असा याचा होतो. संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित !