आंबडपाल येथील श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी येथे धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

कुडाळ (सिंधुदुर्ग) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विशकपूर्तीच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र संकल्प अभियान सध्या चालू आहे. या अंतर्गत १५ सप्टेंबर या दिवशी तालुक्यातील आंबडपाल येथील श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी (देवाचा डोंगर) येथे उपस्थित हिंदूंना हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा देण्यात आली.

श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमीतील डावीकडून श्री दुर्गादेवी, श्री मच्छिंद्रनाथ आणि शिव यांची छायाचित्रे

आज संपूर्ण भारतामध्ये अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या हिंदुस्थानात हिंदूंचीच मुस्कटदाबी होत आहे. ‘धर्मांध आणि अन्य पंथियांना न्याय अन् हिंदूंवर अन्याय’ अशा प्रकारची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था निर्माण झाल्याने हिंदूंचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होत आहे. आजच्या या परिस्थितीवर एक मात्र उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे म्हणूनच आज आपण आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी शपथ घेणार आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांनी या वेळी केले.  त्यानंतर सौ. अर्चना घनवट यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा उपस्थित राष्ट्र आणि धर्म प्रेमी अन् भक्त  सांगितली.

श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी येथे प्रतिज्ञा सांगतांना सौ. अर्चना घनवट (उजवीकडे) आणि राष्ट्र अन् धर्म प्रेमी

क्षणचित्रे

१. श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमीचे व्यवस्थापक श्री. प्रभाकर सावंत यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. समितीचे उपक्रम येथे सातत्याने राबवू शकतो, असे सांगून धर्मशिक्षण देणारे फलक तपोभूमी परिसरात लावण्यासाठी अनुमती दिली.

२. प्रतिज्ञा घेतल्यानंतर काही धर्मप्रेमींनी समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि समितीचा संपर्क क्रमांक मागून घेतला, तसेच प्रतिज्ञेच्या कार्यक्रमाचे छायाचित्र पाठवण्यास सांगितले.