सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण

रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण करणार्‍यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा, अन्यथा सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू’, अशी चेतावणी सुरक्षारक्षकांच्या वतीने देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : अनधिकृत बांधकामांवरील पक्षपाती कारवाईच्या विरोधात मालवण येथे समुद्रात बेमुदत उपोषण !

बंदर विभाग, प्रशासन यंत्रणा यांनी माझ्या बांधकामाचे प्रकरण न्यायालयात असतांनाही तोडले, तशी कारवाई अन्य बांधकामांवरही होणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा बेमुदत उपोषणाचा निर्णय मी घेतला आहे – दामोदर तोडणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश

महाराष्ट्रात जसे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यश मिळाले. सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे प्रमाण बघता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील प्रशासनाने नोटीस पाठवलेल्या बांधकामांचे फेरसर्वेक्षण होणार !

प्रशासन आम्हाला अनधिकृत ठरवत असेल, तर त्या भूमीचे सर्वेक्षण करून प्रशासनाने खात्री करावी. आम्ही अनधिकृत भूमीत रहात नाही हे सिद्ध होईल’, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याविषयी प्रशासनालाही निवेदने देण्यात आली होती.

सिंधुदुर्ग : कणकवली येथे एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळण्याचा प्रयत्न !

चित्रपटांत दाखवतात त्या एकतर्फी प्रेमाच्या कथा काल्पनिक असतात आणि वास्तव निराळे असते एवढेही युवकांना समजत नाही का ?

सिंधुदुर्ग : कलमठ येथील शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक !

वाढदिवसासाठी भेट पाठवल्याचे सांगून एका शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

भगवान श्रीकृष्णाच्या ऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे.

सनातन धर्माविषयी अवमानकारक विधाने (हेट स्पीच) करणार्‍यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट !

सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांत देण्यात आले.

देऊळवाडा, मालवण येथे गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो तरुणांनी पकडला !

‘ही गुरे बेळगाव येथे हत्या करण्यासाठी नेण्यात येत असावीत’, असा संशय येथे उपस्थित तरुणांनी व्यक्त केला असून या ‘प्रकरणातील संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘दुर्गामाता दौडी’च्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर  !

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.