
कुडाळ : वेंगुर्ला तालुक्यातील ‘सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळा’वर ‘नाईट लँडिंग’च्या (रात्रीची विमानसेवा मिळण्याच्या) अनुषंगाने यंत्रणा बसवण्यात आली असून लवकरच या विमानतळावरून रात्रीची विमान सेवा चालू करण्यात येणार आहे. ४ डिसेंबर या दिवशी मालवण येथे साजर्या होणार्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

नौसेना दिन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती मालवण येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ची सुविधा असणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न चालू होते. लवकरच देहली येथील ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालया’चे पथक या विमानतळावर येऊन ‘नाईट लँडिंग’ सुविधेची तपासणी करणार आहे. त्यानंतर चिपी विमानतळावर ही सेवा चालू होणार आहे. ‘सध्या या विमानतळावरून एकाच विमान आस्थापनाकडून केवळ दिवसाची विमानसेवा चालू आहे’, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !