‘टॉयलेट घोटाळा’ हा फक्त एक ट्रेलर असल्याचे प्रतिपादन
नाशिक – टॉयलेट घोटाळा हा एक ‘ट्रेलर’ आहे. मी त्याविषयी तक्रार प्रविष्ट करणार आहे. हा घोटाळा पुष्कळ मोठा आहे. आय.एन्.एस्. विक्रांत प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या जामिनावर सुटले आहेत, त्यांना उत्तर द्यावेच लागेल. कुणी बाँब फोडतो, कुणी देशाच्या अर्थव्यवस्थेची खेळतो, तर लोकांना फसवतो, हा देशद्रोहच आहे. किरीट सोमय्या भविष्यात कारागृहात जाणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी १५ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, सोमय्या यांनी विक्रांत घोटाळा करून भाजपच्या तिजोरीत पैसे जमा केले. भविष्यात घोटाळेबाजांना कारागृहात जावे लागणार आहे. युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली पैसे गोळा करणे हा गुन्हा आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना हीच हिंदूंचे रक्षण करते.