शिवसेनेकडून आमदार रवि राणा यांच्या निवासाबाहेर आंदोलन !
अमरावती – येथील अपक्ष आमदार रवि राणा आणि अपक्ष खासदार सौ. नवनीत राणा यांनी मुंबई येथील शिवसेनेच्या ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण करणार आहे, असे आव्हान शिवसेनेला दिले होते. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन १५ एप्रिल या दिवशी राणा यांच्या येथील निवासाबाहेर आंदोलन करत ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा वाचली नाही, तर मातोश्री रावणाची लंका होईल, अशी टीका त्यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनीही प्रतीटिका केली आहे.