मिरज येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा !

गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट दर्शवणारा चित्ररथ, २ अश्व, ‘मी सावरकर’, अशा लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महावितरण कार्यालयाचा वीजदेयकातील भोंगळ कारभार !

ग्राहकाला अधिक रकमेचे देयक पाठवायचे आणि पुन्हा ते दुरुस्त करण्यासाठी ग्राहकालाच हेलपाटे मारायला लावणे हे चीड आणणारे आहे. आस्थापनाच्या या भोंगळ कारभाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे !

गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

या प्रसंगी लेखक श्री. मिलिंद तानवडे मुखपृष्ठाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजींचे गुण, ऋषितुल्य जीवन सर्वांना अनुभवता यावे, हा उद्देश ग्रंथ लिहिण्यामागे आहे.’’

कुपवाड (जिल्हा सांगली) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम हटवण्यास महापालिकेकडून प्रारंभ !

कुपवाड येथील मंगलमूर्ती वसाहत येथे अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम चालू असल्याची माहिती सांगली महापालिका प्रशासनास समजली. यानंतर नगररचना विभागाने पहाणी करून या संदर्भातील अहवाल आयुक्तांकडे सादर केला.

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांचा मोर्चा !

राज्य सरकारने जुनी सेवानिवृत्त योजना बंद केली आहे. यामुळे सरकारी कर्मचारी अनेक लाभांपासून वंचित रहात असल्याने सरकारने परत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी १२ मार्च या दिवशी सांगली येथे पुष्पराज चौक ते स्टेशन चौक असा भव्य मोर्चा काढला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५० जणांकडून रक्तदान !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास यांच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १० मार्चला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या मुख्यालयात ‘महिलादिन’ उत्साहात साजरा ! 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

घरगुती गॅस सिलेंडरच्‍या झालेल्‍या दरवाढीच्‍या निषेधार्थ करवीर ठाकरे गटाची निदर्शने !

केंद्रात भाजप शासन आल्‍यापासून खाद्योपयोगी वस्‍तूंपासून अनेक वस्‍तूंचे भाव वाढत आहेत. त्‍यातच केंद्रातील भाजप सरकारने गॅस सिलेंडर आणि इंधन यांची दरवाढ केल्‍याने सर्वसामान्‍य जनता महागाईच्‍या आगीत होरपळत आहे.

वढुबुद्रुक येथून ज्‍वाला सांगलीत दाखल !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या बलीदानाच्‍या स्‍मरणार्थ बलीदानमासाच्‍या अखेरीस प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या प्रतिकात्‍मक चितेला अग्‍नि देण्‍यात येतो.

अभाविपच्‍या ‘युथ लीडर्स समिट’साठी जिल्‍ह्यातील विविध महाविद्यालयांतील ७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी !

आगामी काळात विद्यार्थी परिषदेच्‍या माध्‍यमातून राबवण्‍यात येणार्‍या कार्यक्रम-उपक्रम यांची माहिती जिल्‍हा संयोजक दर्शन मुंदडा यांनी दिली. संमेलनाच्‍या शेवटी बालगंधर्व नाट्यमंदिर ते किसान चौक अशी शोभायात्रा काढण्‍यात आली.