हप्तेखोरी करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा सांगली येथे जनआंदोलन उभे करणार ! – नितीन चौगुले, अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रात ५ सहस्र दुकानांना परवाने दिले आहेत; मात्र त्यामध्ये केवळ एका कॅफेला अनुमती दिली आहे.

सांगली येथील हँग ऑन कॅफेचालकास अटक !

कॅफेतील कंपार्टमेंट सिद्ध करून संशयितास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अनिकेत घाडगे या कॅफेचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नवीन वर्षापासून संगणकीयकृत प्रणालीद्वारे घरपट्टीची देयके ! – शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका

यापुढील आमचा प्रवास हा ‘कॅशलेस’ आणि ‘पेपरलेस’ असेल, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी २१ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या.

लिंगनूर (जिल्हा सांगली) येथील मठाचा रथोत्सव उत्साही वातावरणात पार पडला !

मिरज पूर्व भागातील लिंगनूर येथे श्री सद्गुरु गणेश्वर अवधूत महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन मठात श्री सद्गुरु देवांच्या २३ व्या आगमन महोत्सवानिमित्त १७ मे या दिवशी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॅफे बंद करण्यात येतील ! – शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त

महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे काही कॉफी दुकानांच्या नावाखाली मिनी लॉज, स्मोकिंग झोन आणि गैरकृत्य चालू झाले. ते त्वरित बंद करण्यात यावेत, तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत कॉफी दुकान उद्ध्वस्त…

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका !

० मे या दिवशी जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका केली आहे. या गुन्ह्यात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांचा समावेश करण्यात आला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कॅफेंची पडताळणी चालू !

कॅफेची तोडफोड केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विविध संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या नेत्यांनी अनधिकृत कॅफेवर कारवाई होण्यासाठी आंदोलनाची चेतावणी दिली.

सांगली येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भव्य मोर्चा !

येथे १९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी सकल हिंदु समाज संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र काही तांत्रिक आणि इतर कारणांमुळे हा मोर्चा २६ मे या दिवशी…

शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनायक एडके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला यश !

महापालिकेतील बनावट नळजोडणी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात सतत पाठपुरावा करून आवाज उठवणारे श्री. विनायक येडके यांचे अभिनंदन !

‘कॅफे’ संस्कृती त्वरित न थांबवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू ! – राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची चेतावणी

आमदार अरुण लाड म्हणाले, ‘‘सांगलीत ‘कॅफे’च्या नावाखाली भयानक प्रकार चालू आहे. अल्पवयीन मुलींना आमीष दाखवून त्यांना ‘कॅफे’त नेऊन गैरप्रकार केले जातात. पोलिसांनी पैसे खाल्ले, तर कारवाई कशी होणार ?