१९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ सांगलीत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोर्चा !

यासाठी भाजपचे आमदार श्री. नितेश राणेही उपस्थित रहाणार आहेत. हा मोर्चा सायंकाळी ५ वाजता झुलेलाल चौक येथून प्रारंभ होईल. दीनानाथ चौक, मारुति चौक, बालाजी चौक, कापडपेठ, स्टेशन चौक मार्गे जाऊन राममंदिर येथे त्याचे सभेत रूपांतर होईल.

विजय वडेट्टीवार यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना हे लक्षात येत नाही का ?

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरज येथे पदयात्रेचे आयोजन !

सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ ५ मे या दिवशी सकाळी १० वाजता मिरज येथे महायुतीच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली सदिच्छा भेट !

योगी आदित्यनाथ यांच्या सभेला ते धारकर्‍यांसह उपस्थित होते. यापूर्वी पू. भिडेगुरुजी यांनी २७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती.

काँग्रेसकडून मुसलमानांचे लांगूलचालन ! – योगी आदित्यनाथ

काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये देशाचा सन्मान हरवला होता. आतंकवाद वाढला आणि भ्रष्टाचार बोकाळलेला होता; परंतु १० वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारने ही प्रतिमा पुसून काढली.

सांगली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या मुसलमानास १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा !

पीडित मुलीच्या आईने पीडित मुलगी हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला शोधले. 

सांगली येथील विवाहिता शीतल लेंढवे हिच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी !

अशी मागणी का करावी लागते ?

सांगली येथील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस !

खर्च नियंत्रण कक्षात सादर केल्यानुसार ९ लाख २ सहस्र ५०८ रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष नोंदवहीतील नोंदीनुसार हा खर्च ६ लाख ९४ सहस्र ९३३ रुपये आहे. या दोन्हीतील फरक २ लाख ७ सहस्र ५७५ रुपये आहे.

सांगली येथे प्रकाश शेंडगे यांच्या वाहनावर शाईफेक अन् चपलांचा हार घालत चिटकवले धमकीचे पत्र !

वाहनाच्या काचेवर धमकी वजा चेतावणीही देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा प्रकाश शेंडगे यांनी निषेध केला असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वेलणकर आयुर्वेदिक औषध दुकानाचे संचालक रमेश वेलणकर यांचे निधन !

रमेश वेलणकर हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. राम वेलणकर यांचे वडील होते.