समाजकल्याण विभागाच्या अधिकारी सपना घोळवे यांना सांगली येथे लाच घेतांना अटक !

भरघोस वेतन असतांनाही लाच घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करून कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !

सांगली येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे ! – शुभम गुप्ता, आयुक्त

सर्व विभागांतील संबंधित अधिकार्‍यांनी मान्सून परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजनांसाठी दक्ष रहावे. विनापरवाना अधिकारी आणि कर्मचारी रजेवर गेल्यास त्यांच्यावर विनानोटीस कारवाई होईल.

कत्तलीसाठी ३०० गोवंशियांना डांबणार्‍या ४ आरोपींना कवठेमहांकाळ येथे अटक !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते ! पोलीस ते करणार का ?

सांगली शहरातील कॅफेचालकांवर कडक निर्बंध घालणार !

शहरातील १०० फूटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ‘हँग ऑन कॅफे’सह ३ अवैध कॅफेची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी पुढील कार्यवाहीला प्रारंभ केला.

४ जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !

सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे.

अवैध गोवंश तस्करीचे सखोल अन्वेषण करावे !

अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केलेले वाहन परत परत सुटते कसे ?

ब्राह्मण समाज चुकल्यास ऐकून घ्या; पण विनाकारण कुणी शेपटीवर पाय दिला, तर सोडायचे नाही ! – (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

सांगली येथील कार्यक्रमात खासदार (प्रा.) सौ. मेधा कुलकर्णी यांचे आमदार अमोल मिटकरी यांना खडेबोल !

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यामुळेच काशीचे पुनर्निर्माण झाले ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार, भाजप

देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीचे माहात्म्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा प्रस्थापित केले. राजमाता अहिल्यादेवींचे हे उपकार हिंदु समाज कधीच विसरणार नाही’, असे विचार भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथे व्यक्त केले.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध राज्यभरात उसळली संतापाची लाट, भाजपचे आंदोलन, तर राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी !

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण !

सांगली येथे कत्तलीसाठी नेणारी ६ गायींची वासरे गोरक्षकांनी पकडली !

गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !