कत्तलीसाठी ३०० गोवंशियांना डांबणार्‍या ४ आरोपींना कवठेमहांकाळ येथे अटक !

कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली), ५ जून (वार्ता.) – ३ जून या दिवशी येथे  कत्तलीच्या उद्देशाने ४ ठिकाणी डांबून ठेवलेले जवळपास ३०० गोवंशीय ज्यामध्ये वासरे, देशी गाय, बैल, म्हैस आणि रेडकू यांची कत्तलीपासून पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी बाजीराव चंदनशिवे, आन्नपा, संजय वाघमारे आणि हिम्मत चंदनशिवे या आरोपींना अटक केली आहे.

या कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता राजीव भाई गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अंकुशजी गोडसे, प्रतिक ननावरे, विशाल बिंद, साईनाथ जाधव, अतुल जाधव, पांडुरंग रोडे, राजेश पवार, तसेच सर्व गोरक्षक बंधू, पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी पोलिसांनी ‘आरोपींवर तडीपारीची कारवाई करून गोवंशियांच्या कत्तलीला प्रतिबंध करू’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका 

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता यातून स्पष्ट होते ! पोलीस ते करणार का ?