सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
लेखांक ८३
‘आपल्या घरच्या लागवडीमध्ये फळे आणि भाजीपाला यांच्या समवेत फुलझाडांचीही लागवड करणे आवश्यक आहे. फुलझाडे लागवडीची शोभा वाढवतात. त्यांचा सुगंध मनाला प्रसन्नता देतो. फुलझाडे लावल्याने प्रतिदिन देवपूजेसाठी घरची फुले उपलब्ध होतात. फुलांमुळे विविध प्रकारचे ‘मित्र कीटक’ (मधमाश्या, फुलपाखरे, पतंग इत्यादी) आकर्षित होतात. हे ‘मित्र कीटक’ परागीभवनाचे कार्य करत असल्याने सर्वच झाडांना फळधारणा होण्यासाठी साहाय्य होते. त्यामुळे झेंडू, शेवंती, मोगरा, चाफा, जास्वंद इत्यादी फुलझाडे अवश्य लावावीत.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.२.२०२३)
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !
ई-मेल करण्यासाठी सोबतचा क्यू.आर्. कोड स्कॅन करा ! |