वेलवर्गीय भाज्यांसाठी मोठ्या आकाराची कुंडी किंवा वाफा अधिक योग्य !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ८०

वेलवर्गीय भाज्या

‘उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये दुधी भोपळा, काकडी, कारले, दोडके, तोंडली इत्यादी वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली जाते. हे सर्व वेल जसे वरच्या दिशेने पसरतात, तशी त्यांची मुळे भूमीखाली पुष्कळ प्रमाणात आडवी पसरतात. त्यामुळे लहान आकाराच्या कुंडीत वेलवर्गीय भाज्यांची वाढ चांगली होऊ शकत नाही.

सौ. राघवी कोनेकर

या वेलभाज्या शक्य असल्यास विटांच्या वाफ्यात लावाव्यात किंवा फळांचे क्रेट, प्लास्टिकचे ड्रम, अशा पसरट आकाराच्या भांड्यांमध्ये त्यांची लागवड करावी.’

– सौ. राघवी मयूरेश काेनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (८.२.२०२३)

तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !
[email protected]