लहान रोप मुख्य कुंडीत लावतांना संध्याकाळी लावावे !
रोपवाटिकेतून आणलेले रोप पिशवीतून कुंडीमध्ये लावतांना किंवा भाजीपाल्याचे लहान रोप कुंडीत किंवा वाफ्यात लावतांना शक्यतो संध्याकाळच्या वेळी लावावे.
रोपवाटिकेतून आणलेले रोप पिशवीतून कुंडीमध्ये लावतांना किंवा भाजीपाल्याचे लहान रोप कुंडीत किंवा वाफ्यात लावतांना शक्यतो संध्याकाळच्या वेळी लावावे.
परागीभवन म्हणजे नर फुलातील पुंकेसर मादी फुलातील स्त्रीकेसरांवर पडून फलधारणा होण्याची क्रिया. मिरची, वांगी, टोमॅटो, यांसारख्या झाडांना द्विलिंगी फुले असतात, म्हणजे एकाच फुलात स्त्रीकेसर अन् पुंकेसर असतात.
‘अमेरिकन कर्करोग सोसायटी’ आणि ‘बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’, या संस्थांनी केलेल्या एका संशोधनातून ‘बागकाम करणार्यांच्या तणावात आणि चिंतेच्या पातळीत लक्षणीय घट होते’, असा निष्कर्ष काढला आहे.
‘लागवडीतील प्रत्येक कृतीच्या लिखित नोंदी ठेवल्यास त्याचा पुष्कळ लाभ होतो. बियाणी पेरल्याचा दिनांक आणि उगवण चालू झाल्याचा दिनांक यांची नोंद ठेवावी; तसेच रोपवाटिकेतून एखादे नवीन रोप आणल्यास त्याच्याही दिनांकाची नोंद ठेवावी.
भावी भीषण आपत्काळापूर्वी आपण देशी वाणांची (बियाण्यांची) साठवणूक आणि संवर्धन करण्यास आरंभ केला, तर बियाण्यांच्या संदर्भात स्वावलंबी झाल्याने पुष्कळ लाभ होऊ शकतो.
वातावरणात होणारे पालट आणि त्यांचा झाडांवर होणारा परिणाम, यांतील बारकावे प्रत्येक ऋतूत निरनिराळे असतात. हे सर्व समजण्यासाठी काही काळ सातत्याने आणि चिकाटीने लागवडीचे प्रयत्न चालू ठेवावेत.
‘आज अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेली ‘हायब्रीड’ बियाणी पेठेत सहज उपलब्ध आहेत; परंतु या बियाण्यांच्या उपयोगाने होणार्या लाभांपेक्षा होणारी हानी पुष्कळ गंभीर आहे. देशी बियाण्यांपासून मिळणारा भाजीपाला आरोग्यास लाभदायक आणि चवीलाही अधिक चांगला असतो.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होेणार्या लेखमालेतून घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला पिकवण्यासाठी शास्त्रोक्त माहिती मिळाल्याने ‘त्याविषयी नेमकेपणाने कसे प्रयत्न करायचे ?’, याची माहिती मला मिळाली.
‘पालापाचोळ्याच्या आच्छादनामुळे मातीचा पृष्ठभाग झाकला जातो. तो झाकल्याने पुष्कळ लाभ होतात. ‘आच्छादन करणे (भूमी झाकणे)’, हा नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचा स्तंभ आहे.
आपल्या लागवडीतील सुकलेले प्रत्येक रोप किंवा वेलीची एकही काडी टाकून न देता त्याचा पुनर्वापर करावा. हे सर्व अवशेष कुजून झाडांना जीवनद्रव्ये उपलब्ध करून देतात.