सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ७८
‘घरच्या घरी फळे, भाजीपाला यांची लागवड करतांना त्यात घरातील लहान-मोठ्या सर्व सदस्यांचा सहभाग असावा. असे केल्याने ‘एखादी भाजी ताटात येण्याआधी ती कशी लावली जाते ? ती किती कालावधीने सिद्ध होते ?’, असे अनेक बारकावे सर्वांच्या लक्षात येतात. सर्वांनी कष्ट करून पिकवलेला भाजीपाला खातांना निराळेच समाधान मिळते, तसेच ‘प्रतिदिन ताटात वाढल्या जाणार्या पदार्थांचे पोषणमूल्य आणि त्यांचे औषधी गुणधर्म’, यांची समज वाढते. त्यामुळे भूमाता आणि निसर्गदेवता यांच्याविषयी कृतज्ञताभाव आपोआप निर्माण होतो.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (८.२.२०२३)
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !
[email protected]